Posts

Showing posts from September, 2020
 दिनांक भाद्रपद ७, १९४२ (२९ ऑगस्ट २०२०) आपण रडतो आणि आपली आई हसत असते तो एकमेव दिवस म्हणजे आपला जन्मदिवस. जसे दोन ठिकाणांतील प्रवासात लावलेले अंतर दाखवणारे फलक आपला किती प्रवास झाला हे सांगत असतात. त्याचप्रमाणे, आपला वाढदिवस आपल्या जीवनप्रवासातील किती टप्पा पार केला हे सांगतात. दोन ठिकाणांतील प्रवास किमी मध्ये मोजता येतो तसेच मैलांमध्येही मोजता येतो. त्याचप्रमाणे काळाचा प्रवास चांद्र वर्ष किंवा सौर वर्षांमध्ये मोजता येतो. सौर कालगणनेनुसार म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरनुसार आज माझा ५० वा वाढदिवस! या अर्धशतकी प्रवासात अनेक सुहृदांचे आशीर्वाद, शुभेच्छा पाठीशी होत्या/ आहेत आणि पुढेही राहतील. यानिमित्ताने काही आठवणींना उजाळा... आई किंवा पप्पा ह्यांच्या आठवणींपेक्षाही आधीपासून जर कोणा व्यक्तीच्या आठवणी मला असतील तर त्या माझ्या आजीच्या! डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेशमंदिरात ती मला घेऊन जात असे. तिथे जाताना वाटेत रस्त्यावरून आजीबरोबर चालत असतानाच्या आठवणी ह्या माझ्या पहिल्या आठवणी. तिच्याबरोबर मिरजेला राहिल्याच्याही आठवणी आहेत. जिथे आजी तिथे मी हे ठरलेलेच! एक दिवस मात्र ती दिसली नाही. म...

कर्नल

कर्नल... दिलीपचे टोपणनाव! तसा दिलीप काही माझा विशेष आवडता खेळाडू नव्हे, किंबहुना अंमळ नावडताच! त्याची खेळी पाहून त्याला पडलेले 'दिलीप पॅडपुढेकर' हे नाव सार्थ करणाराच त्याचा खेळ वाटायचा. खरेतर त्या खेळामुळेच तर हे नामाभिमान त्याला मिळालं होतं. मुंबईच्या क्रिकेटच्या मातीतील खडूसपणा मात्र त्याच्यात पुरेपूर मुरलेला होता. लॉर्ड्स ह्या क्रिकेट पंढरीमध्ये तीन कसोटी शतके काढणारा तो पहिला (कदाचित अजूनही एकमेव) परदेशी फलंदाज म्हणूनच तो 'लॉर्ड ऑफ लॉर्ड्स' ठरला होता! १९८७ च्या वर्ल्ड कप नंतरची पहिलीच कसोटी मालिका होती. सनी नुकताच निवृत्त झाला होता. कर्नलच्या गळ्यात कर्णधारपणाची माळ पडली होती. वेस्ट इंडिजने दिल्लीवर झेंडा फडकवल्यामुळे मालिकेतील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्याबद्दलची उत्सुकता फारच वाढली होती. सामना मुंबईत, त्यातून भारताने जिंकणे आवश्यक झालेले.  सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नव्हती. मात्र भर मार्गशीर्ष महिना असूनही दीड दिवस पर्जन्यराजाने गाजवला होता. शेवटचा दिवस बाकी होता तेव्हा वेस्ट इंडिजची पहिल्या डावातीलही शेवटची विकेट बाकी होती. सामना अनिर्णितावस्थेत ...

बॉबी

 'लाली, शांत बस बघू. माझ्या आणि बॉबीच्या मध्ये येऊ नकोस'. मला लालीपेक्षा बॉबीच जास्त आवडायची. बॉबी होतीच तशी. सुंदर, गोड, लाघवी! लाली तशी वाईट नव्हती पण.... लाली आमच्या घराभोवती फेऱ्या मारत माझे लक्ष जातेय का हे पाहात असायची. मात्र मी बॉबीबरोबर असल्याचे पाहून मात्र ती गप्प राहायची. बॉबी तिचंच पिल्लू होत.... पांढरशुभ्र! हळूहळू बॉबी मोठी होत होती, तशी लालीही तिला एकटं सोडू लागली. लाली आता आमच्या घरापासून लांब भटकायला लागली पण बॉबी मात्र आमच्या घरापाशीच राहत होती. बॉबीबरोबर खेळता खेळता मी खुष असायचो. मात्र मला एक आश्चर्य वाटायच की मी दोन पायांवर चालायचो, तशी लाली आणि बॉबी का चालत नाहीत? मग मी बॉबीचे पुढचे पाय धरायचो आणि तिला बजावायचो, ' बॉबी, आता दोन पायावरच चालायचं बर का माझ्यासारख.' ती पण प्रयत्न करायची...पण मी हात धरलेले असेपर्यंतच! मी हात सोडले की लगेच ती पुढचे पाय टेकायचीच. विक्रम वेताळच्या गोष्टीप्रमाणे मी पुन्हा तिला दोन पायांवर चालायला शिकवायला लागायचो. आमच्या घरी आठवड्यात दोनदा खारी बिस्कीट घेऊन एक माणूस यायचा. केवढी मोठी पेटी असायची त्याच्या डोक्यावर... मी बसलो त...

आदर्श शिक्षक

 'बंड्या शाळेत जातो मग मी का नाही? मला पण शाळेत जायचंय'. माझ्याहून वर्ष सहा महिन्यांनी लहान असलेला बंड्या शाळेत जायला लागल्यापासून मी आईमागे भुणभुण सुरू केली होती. अखेरीस हो ना करता करता माझाही शाळेत प्रवेश झाला. कागदेबाईंची 'जिजामाता मंदिर' शाळा मला पहिल्याच दिवशी आवडली. इतकी मुलंमुली एकत्र रोज भेटणार.. वा, शाळा हे छानच प्रकरण आहे. मॉंटेसरीच्या वर्गाला सुपेकर बाई शिकवत होत्या. अतिशय शांत स्वभावाच्या सुपेकरबाई मुलांच्या आवाजात कशा टिकून राहत ह्याचे आता मला आश्चर्यच वाटते. मात्र मला त्यांच्या वर्गात फार दिवस बसावे लागले नाही. शाळा मॉंटेसरीपर्यंतच मर्यादित असली तरी कागदेबाईंना ती वाढवायची होती. पुढील वर्गांना परवानगी मिळेल असे गृहीत धरून त्यांनी पहिलीचा वर्ग सुरू केला. वर्गात १९ मुलेमुलीच होती. पण कागदेबाईंना कळले कमीत कमी २० विद्यार्थी असतील तरच पहिलीच्या वर्गाला परवानगी मिळेल. मॉंटेसरीच्या वर्गात कुठे स्थिरस्थावर होतोय न होतोय तोच शाळेला परवानगी मिळावी म्हणून अस्मादिकांना पहिलीच्या वर्गात बसवले गेले. बिचारा बंड्या... तो मॉंटेसरीतच राहिला.  पहिलीच्या वर्गाला मराठेबाई होत...