Posts

Showing posts from April, 2022

पाकिस्तानी रुपया

काश्मीर फाईल्स चित्रपटात एक दृश्य आहे... काश्मीरमधील बाजारामध्ये एक विक्रेता पाकिस्तानी रुपया देतो. त्यावर ग्राहकाला मात्र राग येतो. हे दृश्य पाहून मी विचारले 'असे का बरं? पाकिस्तानी रुपया भारतात दिला तर का राग यावा? तुम्हाला राग येईल का आणि आलाच तर का?' त्यावर उत्तर आले,' पाकिस्तान मध्ये भारतीय रुपया दिला तर ते आपले डोके फोडतील. मग आपल्याला काश्मीर मध्ये पाकिस्तानी रुपया दिला तर का राग येणार नाही?' त्यावर मी म्हटले की,' केवळ एवढेच कारण आहे का? निदान चित्रपटात तरी पाकिस्तानी लोकांनी असे काही केलेले दाखवले नव्हते. मग का बर राग आलेला दाखवला?' त्यावर माझा मित्र म्हणाला, ' ज्या विक्रेत्याने तो पाकिस्तानी रुपया दिला त्याचा हेतू महत्वाचा आहे. त्या रुपया देण्यातून तो हे दाखवत होता की काश्मीर हा भारताचा भाग आहे. ' मी विचारले,' केवळ पाकिस्तानी रुपया देण्यातून काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे असे तो कसे सुचवू शकतो?' माझ्या मित्राकडे ह्याचे उत्तर नव्हते. मग मी म्हटले, ' बर करन्सी राहू दे. जर भारतात पाकिस्तानचा ध्वज उभारला तर? ' मग तो ताडकन म्हणाला,'क...