Posts

Showing posts from October, 2021

दुर्गा

Image
  भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान एक दिवसीय सामना सुरू झाला होता. मागील वर्षीच भारताने एकदिवसीय सामन्याचा विश्र्वकरंडक जिंकला होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मालिका सुरू असूनही भारताचा संघ विजयाचा दावेदार होता. नुकतीच दिवाळीची सुट्टीही सुरू झाली होती. नक्की आठवत नाही पण बहुधा तो सामना दूरदर्शनवर दिसणार नव्हता. खाजगी वाहिन्या तर सुरूच झाल्या नव्हत्या. त्यामुळे ' आकाशवाणी ' कडे कान एकवटून मी समालोचन ऐकता ऐकता घरात ' मिनी क्रिकेट ' चा पटही मांडला होता. सामना सुरू झाला खरा पण थोड्या वेळातच आकाशवाणी प्रक्षेपण बंद पडले. घरात आमची घालमेल सुरू झाली. मी मात्र शांतपणे मिनी क्रिकेट वर लक्ष केंद्रित केले. तरी भारत - पाक सामन्याची चिंता सतावत होतीच. बराच वेळ लोटला आणि..... बातमी आली...ती भारतावर आदळलेल्या आपत्तीची... ती बातमी भारत पाक सामन्याची नव्हती, तर ती होती... भारताच्या लाडक्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येची. आत्ता लक्षात येत होत की आकाशवाणी प्रक्षेपण अचानक का बंद झाले होते. मी खरतर त्या वर्षी दहावी मध्ये होतो आणि इतिहासाच्या पुस्तकात त्याच वर्षी इंदिराजींबद्दल प्रथमच क...