Posts

Showing posts from March, 2021

मागोवा

 दिनांक : भारतीय सौर चैत्र ३, १९४३ तीन दिवसांपूर्वी -रविवारी- संपलेल्या राष्ट्रीय वर्ष १९४२ चा मागोवा भारतीय राष्ट्रीय वर्ष १९४२... अखेर हे वर्ष संपले.. ह्या वर्षाने आपल्याला काय दिले ह्याचा हा मागोवा... हे वर्ष सुरू झाले ते व्यायाम, प्रतिकारक्षमता ह्यांचे महत्व पटवून देतच! 'Survival of the fittest' ह्या उक्तीचा पडताळा ह्या वर्षात सगळ्यांना आला. सायकलवणे हा कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फायदा देणारा व्यायामप्रकार. गेल्या अनेक वर्षात सायकलवण्याचे महत्व कळले नसेल ते ह्या एका वर्षाने शिकवले.  वाहतूक करण्यास इतर मार्ग बंद झाल्याने काहीजण निव्वळ नाईलाज म्हणून सायकलकडे वळले. काहीजण चक्क ५०० ते १००० किमी अंतर कापत कर्मभूमीकडून मायभूमीकडे सायकल चालवत परतले.  एका तरुणीने तर चक्क तिच्या वडिलांनाही सायकलवरून घरी परत नेले. ह्या सगळ्यांची सायकल चालवण्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले गेले. मात्र मला एक शंका सतावत होती, हे लोक सायकलकडे वळले ते त्यांना सायकलविषयी प्रेम होते म्हणून की निव्वळ नाईलाज म्हणून! ह्यांनी ताबडवत गावापर्यंत नेलेल्या सायकलबद्दल ह्यांना...