Posts

Showing posts from June, 2022
पर्यटन करणं हे बहुतेक सगळ्यांनाच आवडत. त्यातही जर जग प्रवास करण्याची संधी मिळाली तर! साधारण शंभर वर्षांपूर्वी तीन पारशी तरुणांनी ही संधी साधली... तेही चक्क सायकल वरून. यासंदर्भात त्यांचे अनुभव 'वीथ सायकलिस्ट अ राउंड द वर्ल्ड' या पुस्तकाद्वारे त्यांनी सांगितले आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे जवाहरलाल नेहरू यांनी!  या तरुणांनी एकंदर ४४००० मैल प्रवास केला. ह्या प्रवासात काही वेळा त्यांना  १४० फ़्रेन्हाईट उष्णता असताना, काही वेळा अन्न आणि पाण्यावाचून तर काही वेळा चाचेगिरीला ही तोंड देत प्रवास करावा लागला. दलदल, घनदाट जंगल ह्यातूनही त्यांना प्रवास करावा लागला. असेही कित्येक मार्ग होते की जिथे पहिल्यांदाच सायकल चालवली गेली. बॉम्बे वेटलिफ्टिंग क्लब येथून १५ ऑक्टोबर १९२३ ला ६ तरुणांनी ह्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. पर्शिया, मेसोपोटेमिया, सीरिया, सिनाई येथील वाळवंट ओलांडत जगातील सर्वात कठीण मार्गातून साडेचार वर्ष प्रवास करणारे हे पहिलेच जगप्रवासी ठरावेत. बेनिटो मुसोलिनी, भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिडींग, जपान टाइम्स, तसेच शांघाय येथील द पॅगोडा हे वृत्तपत्र ह्यांनीही ह्या सा...

गाज

 ' झुक झुक् झुक झुक अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जाऊ या ....' लहानपणी मामाच्या गावाला जाण्यासाठी लागणारी प्रवासाची ओढ जी लागते ती वाढतच जाते. माझ्या मामाच्या गावाला जाताना मध्ये लागणारा ' खंडाळ्याचो घाट ' प्रवासाची गंम्मत आणखीच वाढवत असे. अर्थात आपल्याला प्रवासापेक्षा जास्त ओढ लावत असते ते आपण जाणार असतो ते गंतव्यस्थान...destination. खंडाळ्याच्या घाटातील घनदाट झाडी आनंद देत असायचीच मात्र खरी ओढ असायची ती आजोळची! आजोळला जाणे असो की किल्ले बघणे असो... बहुतेकदा मुख्य आकर्षण प्रवास नव्हे तर डेस्टिनेशन हेच असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना प्रवासापेक्षा तेथील निसर्गच जास्त मोहात पाडत असतो. खर ना! आजोळी गेल्यावर सुट्टीमध्ये आम्हा भावंडांची मैफल चांगलीच जमायची. त्यांच्याबरोबर केलेल्या छोट्या सहली विसरणे शक्यच नाही. कदाचित त्यामुळेच काही वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर प्रवास करत असल्याचे स्वप्न मला पडले. पहाटेच्या झोपेत पाहिलेले हे स्वप्न खूपच आल्हाददायक होते. जागेपणी आपण पाहत असलेल्या स्वप्नाचा आपण ध्यास घेतो तसाच ध्यास मी ह्या झ...