Posts

Showing posts from September, 2021

माझा आदर्श शिक्षक

 'आज करे सो कल, कल करेसो परसो जलदी क्या है, जब जीना है बरसो' ह्या तत्वानुसार मी वागत होतो. शारीरिक श्रम म्हणजे ज्यांना बुद्धी  वापरता येत नाहीत अश्या लोकांची आवश्यकता असा सोयीस्कर (गैर)समज मी लहानपणापासून पक्का जपला होता. शिवाय तसेही मी दिवसभर भरपूर खेळ खेळत असायचो, त्यामुळे माझी अंगमेहनत तशीही होतच आहे. वेगळ्या व्यायामाची काय गरज? मात्र बँकेत नोकरी लागल्यानंतर रोजचा खेळ कधी थांबला हे लक्षातच आले नाही. रोजचा इतर व्यायाम आधीपासूनच नव्हता. मी पदवी मिळवली त्याचदरम्यान जागतिकीकरणाचे परिणामही दिसू लागले होते. मध्यमवर्गाची वाटचाल उच्चमध्यवर्गाकडे सुरू झाली होती. मी ही हळूहळू त्या मार्गाला ओढला जाऊ लागलो. 'लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्यसंपत्ती लाभे' ह्या मंत्राचा त्याग करून मध्यरात्रीपर्यंत जागणे ह्यात भूषण वाटू लागले. काही वर्षातच ' सोफा, कार, मॉल' ह्या संस्कृतीचा कधी भाग झालो हे समजलेच नाही. सोफ्यावर बसून टीव्ही वर जाहिराती बघायच्या, मग कार मध्ये बसून त्या जाहिरातीतील पदार्थ आणायला मॉल मध्ये जायचे हीच ती 'सोफा, कार मॉल संस्कृती ' ह्या सगळ्याचा परिणाम होणे स...