भटकी (Nomad)
गेल्या रविवारी अग्रिमा नायर माझ्या घरी राहायला आली होती. आई वडील दोघेही आर्मी मध्ये! एकुलती एक मुलगी. १७ व्या वर्षापर्यंत आई वडील ह्यांच्या बरोबर वेगवेगळ्या शहरात राहण्यात गेले. मग मात्र तिने आई वडिलांबरोबर फिरणे थांबवले.... म्हणजे... आता.. ती एकटीच निरनिराळ्या शहरात राहू (भटकू) लागली. कोणत्याही शहरात सलग दोन - तीन महिन्यांपेक्षा जास्त मुक्काम नाही. ही फिरस्ती चालू असताना शिक्षण काय आणि कसे घेणार? अग्रिमाने बायो टेक मध्ये मास्टर्स केले, नुरो सायन्स मध्ये PhD केली. हे सुरू असतानाही भटकेगिरी सुरूच! यादरम्यान थोडा स्ट्रेस जाणवायला लागल्यावर तिचे लक्ष योगाभ्यासाकडे वळले. मग काय योग थेरपी मध्ये थेट मास्टर्स पूर्ण केले. आता तरी स्थिरावायचे... हिने Anatomy आणि आयुर्वेद देखील सोडले नाही. त्यांच्याही अभ्यास केला. गेल्या वर्षापर्यंत म्हणजे...वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत शिक्षण सुरू होते. ह्या सगळ्या प्रवासादरम्यान खरतर भ्रमंतीदरम्यान अनेक बौद्ध भिक्खू तिचे मित्र झाले. ही केरळमध्ये असताना एका बौद्ध भिक्खूने तिला भेटायला बोलावले. तो होता लडाखला! मैत्री केली आहे......