दोस्त असावा तर असा
दोस्त असावा तर असा... दोस्ती म्हणजे मैत्री ही खरोखरच ईश्वराची देणगी म्हणायला हवी. ती मागून मिळत नाही आणि बाजारात विकतही मिळत नाही. आपली मैत्री जुळायला मनाचे बंध जुळावे लागतात. मात्र केवळ मन सांभाळणाऱ्याला मित्र म्हणता येईल का? तो तर खूषमस्कऱ्या झाला. मित्र असा पाहिजे जो आपल्या पाठीशी घट्ट उभाही राहील आणि आपला पाय घसरत असेल, आपण चुकत असू तर आपल्याला योग्य वाटेवरही आणेल. लहानपणी दिवसभर मैदानी खेळ खेळण्यात आपली ऊर्जा खर्च होत असते. मात्र विशी-पंचविशीनंतर आपले बैठे खेळच अधिक सुरू होतात... त्यात कार्यालयीन कामकाजही आलेच. हळूहळू आपण जगणेच विसरून जातो, आलेला दिवस ढकलणे इतकं ओझं वाहण्यात जीव गुदमरतो. काहीजण तर हसणंही विसरून जातात. आश्चर्य म्हणजे आपण काय काय विसरलोय हेच आपण विसरतो. अश्या वेळी खरा मित्रच आपल्याला सावरतो. असेच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. घर-ऑफिस-घर यात गुरफटून गेल्यावर माझ्यापुरता मी शिल्लकच राहत नव्हतो. खरं तर माझे शाळा कॉलेजमधील अनेक मित्र माझ्या बरोबर होते, बँकेतही अनेक घनिष्ठ मित्र मिळाले होतेच. त्यामुळे तसा मी आनंदी होतोच. मात्र एका मित्राची मी आतु...