पर्यटन करणं हे बहुतेक सगळ्यांनाच आवडत. त्यातही जर जग प्रवास करण्याची संधी मिळाली तर! साधारण शंभर वर्षांपूर्वी तीन पारशी तरुणांनी ही संधी साधली... तेही चक्क सायकल वरून. यासंदर्भात त्यांचे अनुभव 'वीथ सायकलिस्ट अ राउंड द वर्ल्ड' या पुस्तकाद्वारे त्यांनी सांगितले आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे जवाहरलाल नेहरू यांनी!
या तरुणांनी एकंदर ४४००० मैल प्रवास केला. ह्या प्रवासात काही वेळा त्यांना १४० फ़्रेन्हाईट उष्णता असताना, काही वेळा अन्न आणि पाण्यावाचून तर काही वेळा चाचेगिरीला ही तोंड देत प्रवास करावा लागला. दलदल, घनदाट जंगल ह्यातूनही त्यांना प्रवास करावा लागला. असेही कित्येक मार्ग होते की जिथे पहिल्यांदाच सायकल चालवली गेली.
बॉम्बे वेटलिफ्टिंग क्लब येथून १५ ऑक्टोबर १९२३ ला ६ तरुणांनी ह्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. पर्शिया, मेसोपोटेमिया, सीरिया, सिनाई येथील वाळवंट ओलांडत जगातील सर्वात कठीण मार्गातून साडेचार वर्ष प्रवास करणारे हे पहिलेच जगप्रवासी ठरावेत.
बेनिटो मुसोलिनी, भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिडींग, जपान टाइम्स, तसेच शांघाय येथील द पॅगोडा हे वृत्तपत्र ह्यांनीही ह्या साहसाचे कौतुक केले.
Comments
Post a Comment